Fitness

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी घरगुती उपाय

By ExploreinMarathi.com

आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणण्यासाठी केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर न करता घरीच काही सोप्या उपायांचा अवलंब करू शकता. हे उपाय सुरक्षित, खर्चिक नसून त्यांचा चांगला परिणामही दिसून येतो.

एक चमचा हळद आणि दोन चमचे मध एकत्र करून पेस्ट बनवा, 15-20 मिनिटे लावा आणि धुवा. हळद त्वचेला स्वच्छ आणि चमकदार बनवते तर मध त्वचा मऊ आणि हायड्रेट ठेवतो.

हळद आणि मध 

एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा गूळ एकत्र करून पेस्ट बनवा, 10 मिनिटे लावा नंतर धुवा.लिंबाचा रस त्वचा उज्ज्वल करतो तर गूळ त्वचेला पोषण देतो.

लिंबाचा रस आणि गूळ

एक चमचा पिकलेल्या पपईचा पेस्ट आणि  बेसनाचे पीठ एकत्र करून 15-20 मिनिटे लावा आणि धुऊन घ्या.पपई त्वचेला एक्सफोलीएट करून मृत त्वचा दूर करते तर बेसनाचे पीठ तेेलकटपणा कमी करते .

पपई आणि बेसन

एक चमचा भर ओट्स बारीक करून त्यात दोन चमचे दही घाला. 15-20 मिनिटे लावा आणि नंतर धुवा.ओट्स त्वचेला एक्सफोलीएट करतात तर दही त्वचेला हायड्रेट ठेवते.

ओट्स आणि दही

एक चमचा खोबरेल तेलात एक चमचा हळद घाला. हे मिश्रण 15-20 मिनिटे राहू द्या.त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.खोबरेल तेला त्वचेला पोषण देतो आणि हळद त्वचेला स्वच्छ आणि चमकदार बनवतो.

खोबरे आणि हळद

हे उपाय वापरण्यापूर्वी त्वचेवर चेक करा. जर कोणतीही जळजळ किंवा खाज आली तर त्वरित धुवा. या उपायांचा परिणाम त्वचेच्या प्रकारानुसार वेगळा असू शकतो. 

या सारख्या माहितीसाठी येथे क्लीक करा